घरताज्या घडामोडीभारतात दरवर्षी ७ लाख मृत्यूंसाठी abnormal तापमान जबाबदार - लॅन्सेट अहवाल

भारतात दरवर्षी ७ लाख मृत्यूंसाठी abnormal तापमान जबाबदार – लॅन्सेट अहवाल

Subscribe

भारतात पर्यावरणीय बदलांशी संबंधित अशा असाधारण उष्ण आणि थंड तापमानामुळे वर्षापोटी साधारण ७ लाख ४० हजार मृत्यू होत असल्याची आकडेवारी ही लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जरनलच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोनॅश विद्यापिठाच्या संशोधकांच्या नेतृत्वातील आंतरराष्ट्रीय टीमच्या संशोधनात आढळले आहे की, जगभरात ५० लाख इतक्या मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू हे तापमानातील बदलांमुळे होतात अशी आकडेवारी समोर आली आहे. जगभरात सर्व भागांमध्ये साधारणपणे २००० ते २०१९ या कालावधीत ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्वच भागात तापमानात वाढ झालेली पहायला मिळालेली आहे. येत्या काळात हा मृत्यूचा आकडा आणखी गंभीर होईल असाही अंदाज या लॅन्सेटच्या अभ्यासातून मांडण्यात आला आहे.

थंडी आणि उकाड्याचे किती बळी ?

एकट्या भारतामध्ये बदलणाऱ्या तापमानामुळे थंडीच्या कडाक्याने जवळपास ६ लाख ५५ हजार ४०० मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. तर उकाड्याचा पारा वाढल्याने साधारणपणे ८३ हजार ७०० इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या संशोधकांच्या टीमने २००० सालापासून ते २०१९ पर्यंतचा डेटा या संपुर्ण अभ्यासासाठी वापरला आहे. या अभ्यासानुसार वर्षापोटी ९.४३ टक्के इतक्या प्रमाणात जागतिक पातळीवर मृत्यूची आकडेवारी वाढली आहे. थंड आणि उष्ण तापमानामुळेच हे मृत्यू झाले आहे. हे मृत्यू म्हणजे १ लाख व्यक्तींमागे ७४ जणांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे.

- Advertisement -

 

जागतिक पातळीवर ग्लोबल वॉर्मिंगमुळे या मृत्यूच्या आकड्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे होणारे मृत्यू या वाढत्या गोबल वॉर्मिंगमुळे कमी होणे शक्य होईल, असे मोनॅश युनिवर्सिटीच्या प्रा. युमिंग गुओ यांनी सांगितले. पण त्याचवेळी उष्णता वाढीमुळे मृत्यूचा आकडाही येत्या काळात वाढू शकतो अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली. हा दीर्घ काळाच्या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणामही असू शकतो असे त्यांनी सांगितले. विशिष्ट भौगोलिक ठिकाणी हा उष्ण आणि थंड तापमानाचा परिणाम दिसून आला आहे. त्यामध्ये इस्टर्न युरोप, सब सहारन आफ्रिका यासारख्या ठिकाणी सर्वाधिक उष्णतेचे आणि थंडीमुळे होणारे मृत्यू आहेत. थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २००० ते २०१९ या कालावधीत ०.५१ टक्के इतक्या मृत्यूचा टक्का कमी झाला. तर याच कालावधीत उकाड्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ०.२१ टक्के इतकी घट झाली. तापमानामुळे होणारे मृत्यू हे दक्षिणपूर्व आशियामध्ये घट झाली. तर दक्षिण आशिया आणि युरोपमध्ये मृत्यूच्या आकडेवारी सातत्याने भर पडलेली आहे.

- Advertisement -

या संपुर्ण संशोधनासाठी एकुण ४३ देशांमधील आकडेवारीचा वापर करण्यात आला. त्यामध्ये एकुण पाच खंडांचा वापर करण्यात आला. विभिन्न अशा तापमानाच्या, सामाजिक आर्थिक आणि भौगौलिक प्रदेशांचा अभ्यास यानिमित्ताने करण्यात आला. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांचा अभ्यासही यानिमित्ताने करण्यात आला. अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -