Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भुईबावडा पहीलीवाडी येथे डोंगर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

भुईबावडा पहीलीवाडी येथे डोंगर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

वाडीपासून डोंगर काहीसा दूर असल्याने जीवितहानी टळली.

Related Story

- Advertisement -

कोकणात अतिमुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली . या अतिवृष्टीचा फटका भुईबावडा परिसराला बसला असून पहीलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग मोठ्या प्रमाणात कोसळल्याने अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग कोसळला आहे. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

सुमारे दोन एकर परिसराचा डोंगर खचला आहे. वाडीपासून डोंगर काहीसा दूर असल्याने जीवितहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती मात्र ग्राम्सस्थानमध्ये भीती चे वातावरण आहे. अजूनही पावसाची अधूनमधून रिपरिप सुरूच आहे. खचलेल्या डोंगरातील दगड माती सध्या पडीक असलेल्या शेतजमिनीत आली आहे. तर वाडीनजीक असलेली मोरी गाळाने भरली होती. सरपंच बाजीराव मोरे व ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने गाळ उपसून मोरी मोकळी केली आहे.

- Advertisement -