घरताज्या घडामोडीरत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कुंभार्ली घाटात कोसळली दरड; वाहतूक ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कुंभार्ली घाटात कोसळली दरड; वाहतूक ठप्प

Subscribe

राज्यात मागील आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कुंभार्ली घाटात बसला आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे कुंभार्ली घाटानजीक सोनपात्र वळण येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. ज्या घाटात दरड कोसळली आहे, तिथे जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

मागील ४८ दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत ५५ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. तसचे पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भातशेतीसाठी समाधानकारक स्थिती असून ६० टक्के लावणीची कामं पूर्ण झाली आहेत.

अकोल्यात पुराचा तडाखा बसला असून ३० हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अकोला-दर्यापूर, अकोट-अकोला, अंदुरा – अकोट-शेगाव मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी दौरा केला. वर्धा आणि चंद्रपूरमधील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘हा’ राष्ट्रवादीच्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीचे रामदास कदमांना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -