घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली; डेक्कन क्वीन थांबवली

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली; डेक्कन क्वीन थांबवली

Subscribe

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेनंतर मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पळसदरी आणि जामरुंग रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळली. या भागात नेहमी मुसळधार पाऊस पडतो. दरड कोसळल्याने डेक्कन क्वीन कर्जत येथे थांबवण्यात आली आहे. तर कोणार्क एक्सप्रेस वांगणी येथे थांबवण्यात आली आहे. दरड दूर करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -