ठाण्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली

ठाण्यात (Thane) मंगळवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. पावसाची संततधारा कायम असल्याने सखल भागांत पाणी साचले (Water Logging) आहे. तसेच, दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत.

Thane Land Slide

ठाण्यात (Thane) मंगळवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. पावसाची संततधारा कायम असल्याने सखल भागांत पाणी साचले (Water Logging) आहे. तसेच, दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. ठाण्यातील मुंब्रा बायपास जवळील टोल नाका पुढे दरड कोसळल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. (Landslide at mumbra bypass road in thane)

मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. या दुर्घटनेती माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.

दरड कोसळल्याने ती हटवण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत पाणी साचले. कोकणातील घाटमाथ्यावरील परिसरात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. त्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. तसेच, काही ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली. दरड कोसळल्याने वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

ठाण्यात खड्ड्याचा पहिला बळी घोडबंदर रोडवर

दुचाकीवरून ठाण्याकडून मुंबईकडे जात असताना खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन सूफियान शेख हा दुचाकीस्वार दुचाकीवरून रोडवरती पडला. याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा जागी मृत्यू झाला. ही घटना घोडबंदर रोडवरील काजूपाडा येथील रस्त्यावर मंगळवारी सकाळ घडली. ही घटना ताजी असताना, त्याच ठिकाणी मंगळवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल जाऊन अपघातात झाला. मात्र तो दुचाकीस्वार बचावला आहे. अशी माहिती काशीमीरा वाहतुक पोलिसांनी दिल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.


हेही वाचा – राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा