भुईबावडा, करुळ घाटात दरड कोसळली; कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत

राज्यभरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

राज्यभरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. कोकणातील परशुराम घाटात दरड कोसळली असून, कोल्हापूर येथील भुई बावडा घाटात (Bhui Bhavda ghat) दरड कोसळली आहे. तसेच गगनबावडा राजापूर (Rajapur) मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (landslide in bhuibawda ghat kolhapur cause effect on traffic in kolhapur)

भुईबावडा व करुळ घाटात पडझड सुरु होत आहे. जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ दगड माती बाजूला करुन वाहातूक सुरु ठेवण्यात आली आहे. करुळ घाटात अनेक ठिकाणी दरडीची माती दगड गटारात पडल्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावरुन वाहात असून त्यामुळे रस्त्यावर दगडमाती येऊन रस्ता निसरडा झाला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर नापणे दरम्यान रेल्वे रुळावर पुलाचे पाणी आले होते. पहिल्याच पावसात घाट परिसरात दरड कोसळल्याने नागरिकांनी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पुर आला असून, नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

या मुसळधार पावसाचा कोकण विभागाला मोठा फटका बसला असून, वैभववाडी रेल्वे स्थानकातील नापणे येथे रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. तसेच, तालुक्यात ठिकठिकाणी कॉजवे व मोऱ्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहातूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी भातशेतीत पुराचे पाणी घुसल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. सायंकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता.

वैभववाडी शहरात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. सांडपाण्यासाठी योग्य निचरा नसल्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. वाभवे येथे शांतीनदी व कासारव्हाळ यांच्या संगमाजवळ नारायण मांजरेकर यांच्या भात शेतीत पुराचे पाणी घुसल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे.


हेही वाचा – राज्यात 1515 नवे रुग्ण, तर 2062 रुग्ण कोरोनामुक्त