विक्रोळीत पंचशील नगर येथे घरांवर कोसळली दरड, बचावकार्य सुरू

यामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. त्यातच, आता विक्रोळीतील पंचशील नगर येथे घरांवर झाडे उन्मळून दरड कोसळली आहे. यामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्याची मदत सुरु. (landslide in houses in Panchsheel Nagar, Vikhroli)

हेही वाचा – मुंबई परिसरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

दरम्यान, काल सायंकाळपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. कामावर जाण्यासाठी निघालेले चाकरमनी आज रेल्वे फलाटावरच अडकून पडले असून मध्य, पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहे.

मुंबई सह उपनगरात एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.