गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस आहे. यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे आज रात्री कशेडी घाटापासून जवळच पोलादपूरमध्ये दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. आहे. या घटनास्थळी पोलादपूर पोलीस, एलअँडटीची टीम दाखल झाली आहे. अशा रात्रीच्या वेळी दरड हटवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू राहणार असून कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.
कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग राहणार रात्रभर ठप्प.
पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत कोसळली दरड.महामार्गावरील वाहतूक बंद, पोलादपूर पोलिस,एलअँडटीची टीम घटनास्थळी दाखल; रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू राहणार.कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2020
हेही वाचा – घाट, बोगद्यातून पहिला एलर्ट देणार ‘लिकी’