घरमहाराष्ट्रवर्ध्याच्या वसतिगृहातील जेवणात अळ्या, १३ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

वर्ध्याच्या वसतिगृहातील जेवणात अळ्या, १३ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Subscribe

वर्धा – वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहात जेवणात अळ्या निघत असल्याचं समोर आलं आहे. अशा अन्नामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रात्रीच वसतिगृहात आंदोलन केले. रात्री जेवल्यानंतर १३ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या सापडत आहेत. त्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले आहेत. काल रात्रीच्या जेवणातही अळ्या सापडल्या. त्यामुळे १३ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी रात्री वसतिगृहात आंदोलन केले. रात्री नऊ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होतं. १३ विद्यार्थ्यांपैकी ५ मुली आहेत तर, ८ मुलांचा समावेश आहे.

- Advertisement -

यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. मेसच्या जेवणाचे पैसे देऊनही चांगलं जेवन मिळत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अखेर विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि तोडगा काढला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -