शेवटचा टाडा खटला; सुरेश दुबे हत्या, काय लागला भाई ठाकूरचा निकाल?

 

पुणेः बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे हत्या प्रकरणातून भाई ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील यांची पुणे विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी या सर्वांवर टाडा लावण्यात आला होता. टाडा लावण्यात आलेला हा देशातील शेवटाचा खटला असल्याचे बोलले जाते.

नालासोपार्‍यातील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा 9 ऑक्टोबर 1989 ला रेल्वे स्थानकात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. 1992 साली या प्रकरणातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आनंद पाडेकर यांनाही आरोपी करण्यात आले होते. सुरेश दुबे यांचे धाकटे बंधु डॉ. ओमप्रकाश दुबे यांनी रेल्वे पोलीस महासंचालकांकडे दाद मागितली होती. त्यानंतर 16 मे 1997 ला या प्रकरणातील 17 आरोपींची टाडा कोर्टाने मुक्तता केली होती.

डॉ.दुबे यांनी अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नरेंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर फरार असलेल्या भाई ठाकूर, दीपक ठाकूर, गोनन पाटील, संजय कडु, आनंदा पाडेकर आणि आता हयात नसलेले भास्कर ठाकूर, नारायण गौडा यांच्याविरुद्ध पुणे टाडा कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.