घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे लतादीदी जिने डाऊनफॉल... राज ठाकरेंच्या...

Lata Mangeshkar : जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे लतादीदी जिने डाऊनफॉल… राज ठाकरेंच्या भाषणातील लतादीदी

Subscribe

भारतरत्न लता मंगेशकर आणि ठाकरे घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचेही लतादीदींशी अतिशय भावनिक असे नाते होते. अनेक फोटोंमधून तसेच राजकीय भाषणातूनही राज ठाकरेंचे लतादीदींबद्दलचे प्रेम दिसून आले आहे. लतादीदींविषयीचे प्रेम हे गेल्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने झालेल्या एका मुंबईतील प्रचारसभेतही दिसून आले होते. या सभेत राज ठाकरे यांनी लतादीदींचे तोंड भरून कौतुक केले आहे.

Raj and lata mangeshkar

- Advertisement -

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

मला माहितेय त्याप्रमाणे, भारतात निश्चित. जगाचा इतिहास पाहिला तरीही निश्चित. जगात एकमेव व्यक्ती जन्माला आली, की जिने, त्या व्यक्तीने स्वतःचे आयुष्य, करिअर सुरू केले, ती व्यक्ती म्हणजे एक लता मंगेशकर सोडल्या, की भारतात एकमेव व्यक्ती १०० टक्के व्यक्ती अशी आहे, जिने आयुष्यात डाऊनफॉल नाही पाहिला. बॅड पॅच नाही पाहिला, त्यांचे करिअर जेव्हापासून सुरू झाले, तेव्हापासून त्यांचा ग्राफ उंचावलेला आहे.

Raj and sharmila

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या आयुष्यात लतादीदींचे अतिशय विशेष स्थान होते. ते लतादीदींनी आईंप्रमाणे मानत असत. राज ठाकरे यांचा कला विश्वासोबत असणारा कनेक्ट यामध्ये लतादीदींना अतिशय विशेष असे स्थान होते. त्यामुळेच अनेक फोटोंमध्ये राज ठाकरे आणि लता दीदींचे बॉण्डिंग दिसून आले आहे. मग कधी सचिन तेंडुलकरसोबत राज ठाकरे आणि लतादीदी असो वा शालिनी ठाकरेंसोबतचा. राज ठाकरेंनी आपल्या जाहीर भाषणातही लतादीदींच्या कामाचा आणि योगदानाचा भरभरून उल्लेख केला आहे.

raj, sachin and lata


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -