घरमनोरंजनज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल; पीएम मोदींकडून लवकर बरे होण्याची...

ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल; पीएम मोदींकडून लवकर बरे होण्याची प्रार्थना

Subscribe

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर हे ८४ वर्षांचे आहेत. हृदयनाथ मंगेशकर हे भारताच्या गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर याचे छोटे भाऊ आहेत.

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर हे ८४ वर्षांचे आहेत. हृदयनाथ मंगेशकर हे भारताच्या गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर याचे छोटे भाऊ आहेत. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, नेमकं कारण काय? हे अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १०-१२ दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

माटुंगाच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये रविवारी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ मंगेशकर यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. यावेळी आदिनाथ मंगेशकर यांनी वडिल पं. हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

‘गेल्या कित्येक वर्षांपासून माझे वडील पंडित हृदयनाथ मंगेशकर हे या कार्यक्रमाचे स्वागत भाषण देतात. त्यासोबतच ते या ट्रस्टबद्दल माहिती देतात. पण यावर्षी त्यांना हे करणं शक्य नाही. कारण त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने ते येत्या ८-१० दिवसात घरी परततील. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणाही होत आहे’, असंही आदिनाथ यांनी सांगितले.

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळ्यात या पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी हृदयनाथ मंगेशकरांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंबियांबरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.


हेही वाचा – Shahrukh Khan ने बदलली ‘Mannat’ बंगल्याची नेम प्लेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -