Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकरांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, व्हेंटिलेटरवर हलवले

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे प्रतीत समधानी आणि त्यांची टीम त्यांच्या प्रकृतीची सतत काळजी घेत आहेत. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर हलवले. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथक 24 तास रुग्णालयात हजर असते.

lata mangeshkar health update today Lata Mangeshkar still in ICU doctors share health update

मुंबईः गानकोकिळा आणि भारतरत्न असलेल्या 92 वर्षीय लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलीय. गेल्या 27 दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. अलीकडेच त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढून टाकण्यात आले होते, मात्र आज पुन्हा एकदा लतादीदींची प्रकृती खालावलीय, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. 8 जानेवारीला त्यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे प्रतीत समधानी आणि त्यांची टीम त्यांच्या प्रकृतीची सतत काळजी घेत आहेत. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर हलवले. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथक 24 तास रुग्णालयात हजर असते.

काही दिवसांपूर्वीही खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या

काही दिवसांपूर्वीही लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांच्या प्रवक्त्याने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, ‘लोकांमध्ये खोट्या बातम्यांचा प्रसार त्रासदायक आहे. लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. त्या घरी लवकर परताव्यात, अशी प्रार्थना करा. विशेष म्हणजे लता मंगेशकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे माहिती देत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले होते. ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘लतादीदी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयू विभागात उपचार घेत असून त्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. त्यांची एक्सट्यूबेशनची चाचणी करण्यात आली म्हणजेच त्यांचा व्हेंटिलेटर बंद करून ट्रायल करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र तरीही त्यांना काही दिवस डॉक्टर प्रतीत समदानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेसाठी आम्ही आभारी आहोत’, असे मंगेशकर कुटुंबीयांनी सांगितले होते.


हेही वाचा : Lata Mangeshkar Health Update: दिलासादायक! लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, प्रार्थनेसाठी कुटुंबियांनी मानले आभार