Lata Mangeshkar Health Update : लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद, डॉक्टरांची माहिती

ध्या त्यांची प्रकृती खालावलेली आहे परंतु त्या उपचारांना पूर्ण प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

Lata Mangeshkar latest Health Update doctor's information Latadidi response to treatment under icu
Lata Mangeshkar Health Update : लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद, डॉक्टरांची माहिती

गाणसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. लतादीदींवर मागील २७ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाची लागण झाली असल्यामुळे लतादीदींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंरतु आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची तब्येत पुन्हा खालावल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु करण्यता आले होते. सध्या त्यांची प्रकृती खालावलेली आहे परंतु त्या उपचारांना पूर्ण प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादीदींनी कोरोनावर मात केली असून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णलयातच उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. सध्या त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले असून उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

लता मंगेशकरांचा उपचाराला प्रतिसाद

लता मंगेशकर ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन लतादीदींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डॉक्टर म्हणाले की, लतादीदी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लतादीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन केली आहे. राज ठाकरे तब्बल सव्वा तास रुग्णालयात होते. लतादीदींच्या तब्येतीविषयी राज ठाकरेंनी डॉक्टरांनी विचारपूस केली आहे.


हेही वाचा : Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकरांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, व्हेंटिलेटरवर हलवले