घर महाराष्ट्र वरिष्ठांच्या आदेशानंतर मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; अप्पर पोलीस अधीक्षकांचा धक्कादायक दावा

वरिष्ठांच्या आदेशानंतर मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; अप्पर पोलीस अधीक्षकांचा धक्कादायक दावा

Subscribe

जालना : अंतरावली सराटी (Antarwali Sarati) येथे मराठा आंदोलकांवर शुक्रवारी (1 सप्टेंबर) पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मागणीसाठी आंदोलकांकडून उपोषण सुरू असताना लाठीचार्ज झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने केला? असा प्रश्न आंदोलकांसह विरोधीपक्ष तसेच सामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे. याचपार्श्वभूमीवर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर वरिष्ठांनीच लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचे अप्पर पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. (Lathi charge on Maratha protesters after orders from superiors Shocking claim of Upper Superintendent of Police)

हेही वाचा – …तर मी राजकारणातून बाजूला होईन; विरोधकांच्या ‘त्या’ आरोपावर अजित पवारांकडून खुलं आव्हान

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मागील 7 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र 1 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलीसांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची विनंती करण्यासाठी गेले होते. यावेळी आंदोलन आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय पोलिसांनी आंदोलनकांना त्याठिकाणाहून हटविण्यासाठी हवेत गोळीबारही केला. या घटनेचे पुढील काही तासाच राज्यभर पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली तर, अनेक ठिकाणी आजही बंद पुकारण्यात आला होता.

वरिष्ठांच्या आदेशानंतर लाठीचार्ज

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पत्र आम्हाला डॉक्टरांनी दिले होते. त्याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक घेऊन अंतरवाली सराटी येथे आम्ही गेलो. आंदोलकांशी चर्चा सुरू असताना एका बाजूने गोंधळ उडाला आणि त्यानंतर आमच्यावर दगडफेक सुरू झाली. याची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले, त्यानंतर आम्ही आंदोलकांवर लाठीचार्ज केला, अशी माहिती राहुल खाडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजितदादा सत्तेतून बाहेर पडा; मराठा आंदोलकांच्या बारामतीत घोषणा, सरकारला ‘हा’ इशारा

जालन्यातील घटनेची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

दरम्यान, जालन्यातील घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले तर, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे आणि डीवायएसपी यांच्या बदलीच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय नवीन पोलीस अधीक्षक सक्सेना यांची नियुक्त करत त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच जे दोषी आढळतील त्यांना निलंबित करण्यात येईल. वेळ पडली तर न्यायालयीन चौकशी देखील करू. कुणालीह पाठीशी घातलं जाणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

- Advertisment -