घरमहाराष्ट्रव्यवसायातून उद्भवलेल्या स्पर्धेमुळे एकाची हत्या

व्यवसायातून उद्भवलेल्या स्पर्धेमुळे एकाची हत्या

Subscribe

व्यसायातील स्पर्धेमुळे उद्भवलेल्या वादातून कोचिंग क्लासचे संचालक अविनाश चव्हाणचा खून झाल्याची घटना लातूर परिसरात घडली. अविनाशच्या बिझनेस पार्टनरनेच त्याची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी मुख्य आरोपीसह ५ जणांना पोलिसांनी अटक केले आहेत. कमी वयामध्ये अविनाशने सुरु केलेला कोचिंग क्लासचा व्यवसाय यशस्वी झाल्याचा राग मनात ठेवून ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. अविनाश हा या परिसरातील प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे या घटनेचे नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे.

आपला मुलगा वर्गात पहिला यावा असे प्रत्येक पालकाला वाटत असते. यासाठी पैशाची पर्वा न करता त्याला महागड्या शिकवणीत टाकायची तयारी पालकांची असते. यासाठी प्रसंगी कर्जही काढले जाते. अविनाशचा कोचिंग क्लास या परिसरात प्रसिद्ध होता. याच कारणामुळे कोचिंगचा व्यवसाय यशस्वी झाला. अविनाशने काही महिन्यांपूर्वी व्यायामशाळा देखील उभारली होती. याव्यायामशाळेचे उद्घाटन करण्यासाठी त्याने अभिनेत्री ‘सनी लियोन’ला बोलावले होते. त्यामुळे यादोन्ही व्यवसायातून त्याला चांगले उत्पन्न मिळत होते.

- Advertisement -

पार्टनरशिपमध्ये सुरु केला होता क्लास
चंदन कुमार आणि अविनाश चव्हाण जुने पार्टनर होते. अविनाशने क्लास सुरु करण्यासाठी चंदनची मदत घेतली होती. दोघांनी पार्टनरशिपमध्ये हा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. व्यवसाय सुरु झाल्यावर काही महिन्यांनतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर हे पार्टनर विभक्त झालेत. मात्र अविनाश बद्दल चंदनच्या मनात राग तसाच राहिला. त्याने अविनाशचा काटा काढायचा ठरवले. यासाठी त्याने २० लाखाला अविनाशची सुपारी दिली. प्रोफेशनल शार्फ शुटरच्या हातून ही हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी अविनाशवर काही दिवस पाळत ठेवली. अविनाश गाडीने जात असताना त्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. याच हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -