Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र अभिमानास्पद! लातूरच्या सृष्टी जगतापने 127 तास नृत्य करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये...

अभिमानास्पद! लातूरच्या सृष्टी जगतापने 127 तास नृत्य करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव

Subscribe

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील सृष्टी जगतापने जवळपास सलग 127 तास नृत्य करुन नेपाळच्या वंदनाचा 126 तासांचा रेकॉर्ड मोडत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताचे नाव कोरले आहे. सृष्टीने 29 मे 2023 रोजी सकाळी लातूर शहरातील दयानंद कल्चरल हॉलमध्ये जागतिक विक्रम मोडीत काढण्यासाठी नृत्याला सुरुवात केली. त्यानंतर सलग 127 तास ती नृत्य करत होती. 4 दिवस चेहऱ्यावर कसलाही थकवा न येता सृष्टी नृत्य करीत होती. 5 वा दिवस आणि रात्र तिच्यासाठी आव्हानात्मक होती. परंतू, शेवटच्या टप्प्यात देशभक्तीपर गीतांवर ती सक्षमपणे टिकून राहिली.

दरम्यान, 6 व्या दिवशी तिच्या नृत्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर 3 जून 2023 रोजी दुपारी कठीण परिश्रमातून आणि जिद्दीने सृष्टीने 126 तासांचा रेकॉर्ड मोडला. यावेळी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी सृष्टीला प्रमाणपत्र देऊन विक्रम प्रस्थापित केल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

यावेळी सृष्टीचे नृत्य पाहण्यासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे तसेच लातूरमधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी ‘हे’ होते नियम

नृत्यादरम्यान सृष्टीला प्रत्येक तासामागे 5 मिनिटांची विश्रांती घेण्याची सवलत होती. परंतू तिने 3 तास सलग नृत्य करुन कधी 10-15 मिनिटे विश्रांती घेतली. 30 सेंकदांपेक्षा अधिक वेळ पायांची हालचाल न केल्यास बाद केले जाते. त्याचे काटेकोर पालन तिने यावेळी केले.

126 तासांपेक्षा नृत्य करण्यासाठी सृष्टीने केली होती 14 महिने तयारी

- Advertisement -

या रेकॉर्डनंतर सृष्टी म्हणाली,126 तासांपेक्षा अधिक वेळ नृत्य करण्यासाठी तिने 14 महिन्यांपासून तयारी केली. आजोबा बबन माने, वडील सुधीर आणि संजीवनी जगताप-माने यांनी संतूलित आहार, योगनिद्रा व ध्यान आणि व्यायामाचा सराव करुन घेतला होता.


हेही वाचा :

अहिल्याबाई होळकर यांचा आयुष्य प्रवास

- Advertisment -