घरमहाराष्ट्रपुणेलावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

Subscribe

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गुलाबबाई संगमनेरकर मूळच्या अहमदनगरमधील संगमनेरच्या होत्या.

भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अतिशय मोजक्या लावण्यांपैकी ‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीवर गुलाबबाई संगमनेर यांनी अदाकारी करावी, अशी इच्छा खुद्द लता दीदींनी व्यक्त केली होती. गुलाबबाई यांचा दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या ‘विठाबाई नारायणगावकर’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

- Advertisement -

सुप्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनात गुलाबबाई संगमनेरकर यांनी गायलेल्या अनेक लावण्या त्याकाळी आकाशवाणीवरील कामगार सभेत प्रसारित होत होत्या. आपली जन्मभूमी संगमनेरचे नावं आयुष्यभर अभिमानाने मिरवणारी ज्येष्ठ कलावंती ‘गुलाबमावशी संगमनेरकर’ अशी गुलाबबाई संगमनेरकर यांची ओळख आहे.

गुलाबबाई संगमनेरकर या महाराष्ट्रातील लोकप्रिय कलावंत आहे. बैठकीच्या लावणीसाठी गुलाबबाई संगमनेरकर यांना ओळखलं जायचं. ‘रज्जो’ या सिनेमातदेखील त्यांनी काम केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन सरकारची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, आशिष शेलारांची मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -