Nitesh Rane : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, वकिलांची ऑनलाईन उपस्थिती

आज कोर्ट रूम मध्ये देखील एक वेगळीच खडाजंगी पाहायला मिळेल. सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत प्रत्यक्ष हजर असून नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर आहेत. तर सतीश माणशिंदें यावेळी ऑनलाइन हजर राहणार आहेत.

lawyer satish maneshinde present online Hearing on Nitesh Rane's bail application today
Nitesh Rane : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, वकिलांची ऑनलाईन उपस्थिती

भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. नितेश राणेंची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाठीच्या दुखण्याचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती परंतु न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आल्यामुळे मंगळवारी सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना न्यायालयाकडून दिलासा मिळणार की कोठडीतील मुक्काम वाढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर संतोष परब हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नितेश राणेंना सुरुवातीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोठडीत असताना तब्येत बिघडल्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. परंतु जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांना कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नितेश राणे यांच्या जमीन अर्जावर कोर्टाच्या आज सकाळच्या सत्रात सुनावणी होणार आहे. साधारणतः साडे बारा ते एक वाजताच्या दरम्यान यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती रोटे आज पासून ४ दिवस सुट्टीवर असल्याची माहीती असून प्रधान न्यायाधीश हांडे यांच्यासमोर या बाबतची सुनावणी होणार आहे. आज कोर्ट रूम मध्ये देखील एक वेगळीच खडाजंगी पाहायला मिळेल. सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत प्रत्यक्ष हजर असून नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर आहेत. तर सतीश माणशिंदें यावेळी ऑनलाइन हजर राहणार आहेत.

नितेश राणेंचं सिटीस्कॅन होणार

संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार नितेश राणे यांच्यावर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सीपीआर रुग्णालयातील ह्रदयरोग विभागात नितेश राणेंवर उपचार सुरु आहे.


हेही वाचा : ‘राऊतांसोबत चहा पिण्याची इच्छा झाल्यानंच घरी आलो’ संभाजीराजे-संजय राऊतांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण