घरताज्या घडामोडीएसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

Subscribe

एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी (17 मे 2023) वृद्धपकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. आज रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 9 वाजता (18 मे) अहमदनगर येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी (17 मे 2023) वृद्धपकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. आज रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 9 वाजता (18 मे) अहमदनगर येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण केवटे यांच्या निधनामुळे एसटी प्रेमींमध्ये (ST Bus) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (laxman shankar kevte conductor of the first state transport bus in maharashtra died at the age of 99)

1 जून 1948 रोजी एसटीचे पहिले वाहक म्हणून रुजू झालेले लक्ष्मण केवटे यांनी दीर्घकाळ एसटीची सेवा बजावली. त्यानंतर १९८४ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते अहमदनगर या त्यांच्या मूळ गावी राहत होते. त्यांना पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, यंदाच्या 1 जून रोजी पहिल्या एसटी प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा (ST Bus) साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

- Advertisement -

1 जून 1948 रोजी अहमदनगर – पुणे या मार्गावर धावलेल्या एसटीच्या पहिल्या फेरीचे लक्ष्मण केवटे हे वाहक होते. ‘अमृतमहोत्सवी एसटीचा कृतिशील साक्षीदार हरपला’, अशा शब्दांत एसटीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण कवटे यांना आदरांजली वाहिली आहे.

“महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. 1 जुन 1948 साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे. या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणारे लक्ष्मण केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“एसटीच्या जन्माची कहाणी ज्यांच्या तोंडून आपण ऐकली ती शक्ती आज अनंतात विलीन झाली. त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हीच आमची प्रेरणा आहे”, असे शेखर चन्ने यांनी म्हटले.


हेही वाचा – शिवभक्तांची इच्छा होणार पूर्ण; लंडनमधील छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात येणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -