Homeमहाराष्ट्रUday Samant : छावा चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकावे, नजरचुकीनं जर...; उदय...

Uday Samant : छावा चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकावे, नजरचुकीनं जर…; उदय सामंतांनी स्पष्ट केली भूमिका

Subscribe

Chhava Film Controversey : उदय सामंत म्हणतात, कोट्यवधी रूपये खर्च करून हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी बनवला आहे. त्यामुळे उतेकर यांना अडचणीत आणण्याचा कोणताही उद्देश नाही. पण...

मुंबई : छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह असेल, तर ते दृश्य काढून टाकावे. चित्रपटावर अन्याय व्हावा, अशी आमची भूमिका नाही. मात्र, नजरचुकीनं काही दृश्ये असतील, तर त्यात बदल करावा, अशी आमची भूमिका आहे, असं मत उद्योग आणि मराठी भाषाचे मंत्री उदय सामंत यांनी मांडलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उदय सामंत म्हणाले, “छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज हे लेझीम खेळताना दाखवले आहेत, हा अनेकांचा आक्षेप आहे. त्यामुळे हा चित्रपट तज्ज्ञ आणि इतिहासकारांना दाखवला पाहिजे. ‘या चित्रपटात आक्षेपार्ह असेल, तर काढून टाकले पाहिजे,’ अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांची आहे. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजेंनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांशी चर्चा केली आहे.”

हेही वाचा : शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नसते तर, राऊतांची खोचक टीका

“कोट्यवधी रूपये खर्च करून हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी बनवला आहे. त्यामुळे उतेकर यांना अडचणीत आणण्याचा कोणताही उद्देश नाही. पण, एखाद्या व्यक्तीमत्त्वाबद्दल ज्यांना आपण दैवत्त्व मानतो, अशांबद्दल चित्रपटात काल्पनिक काहीही असू नये, अशी भूमिका छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली आहे,” असं उदय सामंत यांनी म्हटलं.

“चित्रपटात जर आक्षेपार्ह असेल, तज्ज्ञ आणि इतिहासकारांनी सांगितल्यास ते दृश्य काढून टाकावे. चित्रपटावर अन्याय व्हावा, अशी कुणाचीही भूमिका नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर हिंदी चित्रपट दाखवण्याचे धाडस उतेकर यांनी दाखवले आहे. परंतु, नजरचुकीनं काही झाले असल्यास त्यात बदल करावे, ही आमची भूमिका आहे,” असं मत सामंत यांनी मांडले.

हेही वाचा : छावा चित्रपटातील ‘त्या’ सीनबाबत उदयनराजेंचा थेट दिग्दर्शकाला फोन; म्हणाले, एका दृष्यात…

नेमका वाद काय?

‘छावा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसुबाई यांची भूमिका रश्मिका मंदाना यांनी केली आहे. या चित्रपटात लेझीम खेळ प्रकारावर छत्रपती संभाजी महाराज नृत्य करताना दाखवण्यात आले आहेत. यानंतर मराठा क्रांती मोर्चासह अनेक संघटनांनी टीका करत चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

हेही वाचा : धाराशिवमध्ये ऑपरेशन ‘टायगर’, ठाकरेंचे खासदार अन् आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर?