घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रधर्मांतर रॅकेटमधील म्होरक्याला नाशिकमध्ये अटक

धर्मांतर रॅकेटमधील म्होरक्याला नाशिकमध्ये अटक

Subscribe

नाशिक : उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणातील म्होरक्या नाशिकमध्ये राहत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रविवारी (दि.२६) रात्री नाशिकमधून म्होरक्या डॉ. कुणाल चौधरी ऊर्फ आतिफ मोहम्मद यास ताब्यात घेतले. तो उत्तर प्रदेशातील धर्मांतरातील प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
नाशिकरोडच्या आनंदनगर भागात काही दिवसांपासून आतिफ मोहम्मद नाव बदलून राहत होता. या ठिकाणी मूकबधिर मुले, अपंगांसाठी रुग्णालय चालवत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो उत्तर प्रदेश सरकारने धर्मांतरविरोधी मोहीम सुरु केल्यानंतर मौलाना कलीम सिद्दिकी याला ताब्यात घेतले. त्यानंतर या रॅकेटचा उलगडा झाला. मौलानामार्फत कुणाल चौधरी ऊर्फ आतिफ याला परदेशातून आर्थिक रसद दिली जात होती. या पैशातून तो उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतर करीत होता. आतिफने रशियमध्ये मेडिकल शिक्षण घेतले आहे. त्यात अपयश आल्याने धर्मांतर करण्यास सुरु केले होते. तो काही वर्षे उत्तर प्रदेशमध्ये होता. तेथून कारवाईच्या भीतीपोटी तो नाशिकमध्ये आला होता. त्याने नाशिकमध्ये आपली ओळख लपवली होती. नाशिकरोडच्या आनंदनगर भागात राहात असताना त्याने स्थानिक नागरिकांच्या संपर्कात राहात नव्हता. तो नाशिकमध्ये काय करतो, याविषयी कोणालाच काही कल्पना नव्हती. त्याच्या बँक खात्यावर परदेशातून वेगवेगळ्या खात्यांतून तब्बल २० कोटी रुपये ट्रान्स्फर झाल्याचे समोर आले. तो नाशिकमध्ये असताना स्थानिक पोलीस किंवा महाराष्ट्र एटीएसला काहीच माहिती नसल्याचे कारवाईवरुन समोर आले. त्याच्या बँक खात्यावर २० कोटी कोणी आणि का पाठविले, याची माहिती एटीएसने घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील तपास उत्तरप्रदेश एटीएस करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -