Eco friendly bappa Competition
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले; म्हणाले, किमान पुढच्या अधिवेशनाआधी...

विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले; म्हणाले, किमान पुढच्या अधिवेशनाआधी…

Subscribe

Naharashtra Assembly Budget 2023 | सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या आधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्व सदस्यांच्या भावना सभागृहात मांडल्या.

Naharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या आधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्व सदस्यांच्या भावना सभागृहात मांडल्या.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सदस्य सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करू मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित मंत्री सभागृहात याविषयी बैठकी घेण्याचे आश्वासन देत असतात. मात्र आश्वासन दिलेल्या अनेक बैठका घेतल्याच जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत, त्यावर कोणताही मार्ग निघत नाही. त्यामुळे सभागृहात सदस्यांना बैठका घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले जावे,‍ किमान पुढचे अधिवेशन येईपर्यंत तरी बैठकींचे आयोजन केले जावे. अध्यक्षांनी तसे निर्देश सरकारला देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -