मंत्रिमंडळ विस्तार करायला कशाला घाबरतात?, विरीधी पक्षनेते अजित पवारांचा प्रश्न

ajit pawar

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिदे- फडणवीस सरकारला धारेवर धरले. लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आले पाहिजे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत झिली पाहिजे. राज्य सरकारने ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना का भेटलो याची कारणेही सांगितली.

ऑगस्ट आला तरीही अधिवेशन नाही –

पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यात होते. पण जुलै झाला. ऑगस्ट आला. तरीही यांना मुहूर्त मिळेना. मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुठला ग्रीन सिग्नल मिळेना की त्यांच्यात एक वाक्यता होईना? मंत्रिमंडळ विस्तार  करायला कशाला घाबरत आहेत हे कळायला मार्ग नाही?, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली

राज्यपालांना यासाठी भेटलो –

राज्यातील 13 कोटी जनता फार आशेने पाहत आहे. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. त्या त्या खात्याचे मंत्रीच हे प्रश्न सोडवू शकतात. सचिव म्हणतात, मंत्र्यांचा रिमार्क असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर परिस्थिती टाकली. मात्र, ते लक्ष देत नाहीत. म्हणून राज्यपालांना भेटलो. असे अजित पवार म्हणाले.

तातडीने मदत करा –

मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. पूरग्रस्त भागाचे नुकसान, गोगलगायीचा प्रादूर्भाव, पिकं उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे लोकं आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे तातडीने पावले उचलावीत आणि त्यांना तातडीने मदत करावी. मनुष्यहानी झाली. पाळीव प्राण्यांची हानी, रस्ते खचले, शेती, घर सर्वांचे नुकसान झाले आहे. पूल तुटले आहेत. पंधरा तीन आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे लोकांना मदत दिली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली.