घरमहाराष्ट्रभाजपाची ताकद अपुरी पडत असल्यामुळेच शिवसेनेत पाडली फूट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची...

भाजपाची ताकद अपुरी पडत असल्यामुळेच शिवसेनेत पाडली फूट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

Subscribe

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात हा दौरा असल्याचे सांगण्यात येत असून आहे. या दौऱ्यावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीका केली.

मुंबईचे महत्त्व कमी करून… –

- Advertisement -

यावेळी मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला महत्व देण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलवण्यात आली. मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन सुरु न करता दिल्ली-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु केली. याचा अर्थ मराठी माणसांवरचे प्रेम आणि मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला ते देण्याचे काम सुरू आहे. भाजपाच्या ताब्यत अख्खा देश असताना त्यांना मुंबई महानगरपालिका कशासाठी हवी आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बैठका घेऊन काही होत नाही –

- Advertisement -

फक्त बैठका घेऊन काहीच होत नसल्याचे कळाल्यानंतर भाजपाने शिवसेनेत फूट पाडून ४० आमदारांना आपल्याकडे वळवले. पुन्हा ते मनसेच्या मागेसुद्धा लागले आहेत. त्यामुळे भाजपाची ताकद अपुरी पडत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मात्र, महाराष्ट्राची नवी जनता शिवसेनेसोबत राहणार असा विश्वासह त्यांनी व्यक्त केला.

राज्यपालांवर टीका –

महाविकास आघाडी सरकार असताना अनेक निर्णयांचा पाठपुरावा केला. मात्र, राज्यपालांनी तत्परता दाखवली नाही. आता शिंदे-फडणवीसांच्या काळात प्रलंबित १२ आमदारांच्या यादीवर निर्णय लवकर होणार आहे. यावरून राज्यपालांची तत्परता दिसून येते, असा टोला दानवेंनी भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे.

संजय गायकवाडांवर टीका –

शिवसेनेशी गद्दारी केलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खोके आणि सत्तेतून मस्ती आली आहे. पण ही फुटिरांची खोके आणि मस्ती उतरवू, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -