घर क्राइम "पोलीस यंत्रणेच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको", अजित पवारांची राज्य सरकारकडे मागणी

“पोलीस यंत्रणेच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको”, अजित पवारांची राज्य सरकारकडे मागणी

Subscribe

राज्यात कायदा सुव्यस्था चांगली राखण्याचे काम राज्य सरकारचे असते, असे विधान अजित पवार यांनी केले आहे.

मुंबई | “पोलीस यंत्रणेच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको”, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अकोल्यात (Akola) दंगलसदृश परिस्थितीवरून अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) रविवारी झालेल्या बैठकीसंदर्भात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपसंदर्भाच महाविकस आघाडीची चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अकोल्यात कायदा सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण झाली? यासंदर्भात पत्रकारांनी अजित पवार प्रश्न केल्यावर ते म्हणाले, “अकोलसंदर्भात मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियामध्ये काही क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमुळे काही समजाच्या भावना दुखवला गेला. यामुळे अकोल्यात गट आक्रमक झाला. या सर्व गोष्टींना राज्य सरकारने आवर घातला पाहिजे. सोशल मीडियावर कोणी क्लिप व्हायरल केली यांची शहानिशा केली पाहिजे. अलीकडच्या काळात सायबर गुन्हे वाढ आहेत. ही क्लिप सोशल मीडियावर कोणी व्हायरल केली, याचा मास्टरमाइंड कोण होता. या सर्वांची सखोल चौकशी केली पाहिजे. आज हे एका ठिकाणी झाले आहे पण, दुसरीकडे पसरायला फार वेळ लागणार नाही. राज्यात कायदा सुव्यस्था चांगली राखण्याचे काम राज्य सरकारचे असते. आणि राज्य सरकारच्या हातात असलेल्या पोलीस यंत्रणेचे असते. पोलीस यंत्रणेच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको. या प्रकराच्या चौकशी करण्यासाठी पोलिसांना पूर्णपणे मुभा दिली पाहिजे. तर पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकराचे काम करू शकते. हा यापूर्वीचा अनुभव आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता – अजित पवार

लोकसभेबरोबर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी बैठकी पार पडली. यात कर्नाटकाच्या निकालानंतर विरोधकांमध्ये आनंद द्विगुणीत झाला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महाराष्ट्रात पुढची वाटचाल कशी असेल, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवार बैठक बोलविली होती. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप, कोणत्या जागा कोणी लढवायच्या हे ठरवावे आणि त्याचबरोबर २८८ विधासभेच्या जागांची देखील चर्चा झाली. कारण, लोकसभेबरोबर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होतील अशा चर्चा आहेत. त्यामुळे एकत्र निवडणुका लागल्या धावपळ नको म्हणून महाविकास आघाडीने आधीच तयारी केलेली बरी, अशा पद्धतीने बैठकीत साधक बाधक चर्चा झाली,” अशी माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisment -