Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सप्टेंबरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

सप्टेंबरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंददाराआड चर्चा करण्यात आली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून खळबळजनक दावा करण्यात करण्यात आला आहे.

मुंबई : मागील वर्षी जून महिन्यामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली आणि युतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये स्थापन केले. यानंतर पुन्हा वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडली. ज्यानंतर त्यांनी भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून या तीनचाकी सरकारमध्ये काहीच आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. या तिन्ही पक्षांमधील महत्त्वाचे नेते म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व काही ठीक चालले असल्याचे सांगत असले तरी तसे प्रत्यक्षात दिसून येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Rain Update : राज्यातील ‘या’ भागांत पाऊस परतणार, हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

- Advertisement -

अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या गटातील 8 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले. परंतु दुसरीकडे मात्र शिंदे गटातून इच्छुक असलेल्या आमदारांना मंत्रीपदापासून अद्यापही लांब ठेवण्यात आलेले आहे. मंत्रिमंडळाचा तिसऱ्या टप्प्यातील विस्तार हा लांबला असून काही दिवस म्हणता म्हणता हा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता शिंदे गटातील काही आमदारांकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच रायगडमधील एका कार्यक्रमात महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेल्या एका विधानामुळे आता शिंदे गटामध्ये वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भरतशेठ गोगावले यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तीन कारणांमुळे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपद सोडले होते. ज्यामुळे आता भाजपकडून देखील आपापसात चर्चा करण्यात येत आहे.

शुक्रवारी (ता. 18 ऑगस्ट) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंददाराआड चर्चा करण्यात आली. त्यांच्यामध्ये नेमके काय बोलणे झाले, हे अद्यापही कळू शकलेले नाही. परंतु याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून खळबळजनक दावा करण्यात करण्यात आला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये एक मोठी राजकीय घडामोडी घडणार असल्याची माहिती त्यांच्याकडून आज प्रसार माध्यमांना देण्यात आली. (Leader of Opposition Vijay Wadettiwar claims that a major political event will take place in September)

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील तिन्ही मुख्यमंत्री फारसे एकत्र येताना दिसत नाही. कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला दांडी मारतात. दोन उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित असतील तर मुख्यमंत्री दिसत नाही. महाराष्ट्रातील जनतेला राज्यातील हे नाटक दिसून येत आहे. या सरकारने महाराष्ट्राची पत घालवली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी महाराष्ट्रात हवे ते सुरू असल्याचा घणाघात विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच, येणाऱ्या 15-20 दिवसांत महाराष्ट्रात मोठा बदल होणार आहे आणि हा बदल महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार आहे. राज्यातील मुख्य खुर्चीमध्ये हा बदल होणार आहे. आमची सत्ता येणार नाही पण मुख्यमंत्र्यांची खुर्चीमध्ये मोठा बदल होणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -