Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ' राज्याचा कारभार हा वेड्यांच्या हातात '; राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

‘ राज्याचा कारभार हा वेड्यांच्या हातात ‘; राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

Subscribe

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसंच, राज्यात सध्या वेड्यांचं राज्य आहे, त्यामुळे राज्याची अशी परिस्थिती आहे, अशी टीका राऊतांनी केला.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात 18 जणांच्या झालेल्या मृत्यूवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसंच, राज्यात सध्या वेड्यांचं राज्य आहे, त्यामुळे राज्याची अशी परिस्थिती आहे, अशी टीका राऊतांनी केला.

या सत्ताधाऱ्यांना सत्य ऐकवत नाही. सत्य ऐकल्यावर त्यांची मानसिक स्थिती बिघडते. खोटारड्यांचे हे राज्य आहे. सत्य ऐकण्याची त्यांची मनस्थिती नाही. राज्याचा कारभार हा वेड्यांच्या हाती आहे. हे लोक सत्तेसाठी वेडे झालेले आहेत. उद्या हे लोक महात्मा गांधीनांही वेडं ठरवतील. ज्येष्ठ नेत्यांनाही वेडे ठरवतील. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. बात दूर तक जायेगी, असा इशाराच त्यांनी दिला. ( Leader of the Thackeray group Sanjay Raut has reacted angrily to the death of 18 people in Thane Municipal Hospital Chhatrapati Shivaji Maharaj )

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यांच्या आजारपणावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, 18 रुग्ण मेले, त्यांचा आक्रोश कोणी ऐकायचा? ठाण्यातील आक्रोश कोण ऐकणार? एरव्ही मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन मदत केल्याचं नाटक करतात. ज्या ठाण्याचं प्रतिनिधित्व ते करतात तिथे मात्र पोहोचले नाहीत. हे दुर्दैवी आहे. इतर कोणाची सत्ता असती आणि हे झालं असतं तर अमिश शहा इथे आले असते आणि विचारणा केली असती, अशी टीका राऊतांनी केली.

भाजपचे पोपटलाल कुठे आहेत? नेहमी कोविड घोटाळ्यावर बोलणाऱ्यांनी या मृत्यूच्या तांडवाबाबत जाब कसा काय विचारला नाही? हा कोणाचा घोटाळा आहे? मुंबई ठाण्यासह 14 पालिकेत लोकप्रतिनिधिंची राजवट नाही. तिथे प्रशासक आहेत. त्यामुळे कोणाचाही कोणात पायपोस राहिला नाही. महापालिकेत लोकप्रतिनिधिंची राजवट असती तर हे टाळता आलं असतं.

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि भाजपच्या हट्टामुळे लोकप्रतिनिधिंची राजवट नाही. त्यामुळे लोकांना मरणाला सामोरे जावे लागत आहे. अन् मुख्यमंत्री विश्रांती घेत आहेत, हे दुर्दैवी आहे. आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामा घ्यावा, असं भयंकर कांड झालं आहे, असं राऊत म्हणाले.

( हेही वाचा: Manipur Violence : ‘9 वर्षांत काय केलं ते सांगा, 30 वर्षांपूर्वीचं सांगू नका’; पवारांनी भाजपला सुनावलं )

राहुल गांधींची लोकप्रियता अफाट

राऊत यांनी यावेळी राहुल गांधींचं कौतुकही केलं आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता देशात आणि जगात आहे. 2024 मध्ये राहुल गांधी चमत्कार घडवतील. भारत जिंकेल हे सत्य आहे. राहुल गांधींची लोकप्रियता वाढत आहे. तुम्ही कितीही सुर्यावर थुंका. एक व्यक्ती म्हणजे सूर्य नाही. राजकारणात एकाच वेळी अनेक सूर्य तळपत असतात. त्यामुळे देश घडत असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisment -