घरमहाराष्ट्रVishwanath Mahadeshwar Passed Away : विश्वनाथ महाडेश्वरांना नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली

Vishwanath Mahadeshwar Passed Away : विश्वनाथ महाडेश्वरांना नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली

Subscribe

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत, ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटामध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा फटका देखील बसला आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी 2017 ते 2019 या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून कारभार सांभाळला होता. त्याशिवाय ते शिक्षण समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. शाळेत शिक्षक म्हणून काम केलेल्या महाडेश्वर यांची ओळख ‘सर’ म्हणून होती. त्यांच्या निधनानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत, ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Leaders paid tribute to Vishwanath Mahadeshwar through tweets)

“अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक.उत्तम शिक्षक. शिक्षकांच्या प्रश्नाची जाण असलेला अभ्यासू नगरसेवक.मुंबईचे महापौर पद त्यांनी भूषविले. माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली!” असे ट्वीट करत संजय राऊत यांनी शोक व्यक्त केला.

- Advertisement -

तर, “मुंबईचे माजी महापौर आणि कडवट शिवसैनिक विश्वनाथ महाडेश्वर जी ह्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी धक्कादायक आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, उत्तम कामगिरी करणारे महापौर म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. ॐ शांती 🙏” असे ट्वीट ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

“मुंबईचे माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति 🙏” असे लिहित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

विश्वनाथ महाडेश्वर हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्याचमुळे त्यांनी बंडखोरी झाल्यानंतर देखील ठाकरे गटातचं राहण्याचा निर्णय घेतला होता. सामान्य कार्यकर्त्यापासून ते मुंबईच्या महापौर पदापर्यंतचा त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. 2002 मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते सलग आणखी दोन वेळा म्हणजेच 2007 आणि 2012 मध्ये नगरसेवकपदी विजयी झाले होते. तर 2003 मध्ये त्यांच्यावर शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपावण्यात आली. महाडेश्वर हे महानगरपालिकेतील उच्चशिक्षित सदस्य होते. तर त्यांनी 2017 ते 2019 या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून देखील कामकाज पाहिले आहे.


हेही वाचा – मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन; शिवसेनेने गमावला कट्टर शिवसैनिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -