घरठाणेगणेशोत्सवासाठी 'दिव्या'हून कोकणात विशेष गाड्या सोडा; मनसेचे रेल्वेला पत्र

गणेशोत्सवासाठी ‘दिव्या’हून कोकणात विशेष गाड्या सोडा; मनसेचे रेल्वेला पत्र

Subscribe

कोकणातील गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.परंतु दिवा जंक्शन येथून कोकण वासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कोकणातील गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.परंतु दिवा जंक्शन येथून कोकण वासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. आमदार राजू पाटील यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची आज भेट घेतली असून दिव्यातील स्थानकावरील समस्या देखील त्यांच्या समोर मांडण्यात याआल्या आहेत. (Leave special trains from Diva to Konkan for Ganeshotsav Railway letter of MNS)

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चकरमान्यांची संख्या ही लक्षणीय आहे.वास्तविक रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग आदी गोव्यापर्यत राहणारा मुंबईकर दिवा, कल्याण,डोंबिवली, अंबरनाथ,नेवाळी ,उल्हासनगर, बदलापूर सह अगदी कसारा,खोपोली पर्यंत नोकरी निमित्तस्थायिक झाला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात चाकरमानी आपल्या आपल्या कुंटुबासह मूळ गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करत असतो. मात्र गणेशोत्सव तोंडावर आल्यावर दिवा जंक्शन वरून गाड्या सोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून घोषणा करण्यात येते. परंतु त्यावेळी प्रवाश्यांमध्ये गोंधळ उडून नियोजन करण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे तातडीने रेल्वे प्रशासनाने घोषणा करावी जेणेकरून चाकरमान्यांना नियोजन करणे सोपे होईल, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.आमदार पाटील यांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे आता रेल्वे अधिकारी यांची अधिकृत घोषणा कधी करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

आमदार राजू पाटील यांनी रेल्वेचे महाव्यस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतल्या नंतर दिवा स्थानकातील समस्या त्यांच्या समोर मांडल्या आहेत.यामध्ये प्रामुख्याने दिवा जंक्शन वरून गणपती स्पेशल ट्रेन सुरू करने, दिवा पनवेल – वसई रोड – पनवेल -रोहा रेल्वे मार्गावरील पॅसेंजरचे बंद केलेले रेल्वे थांबे सुरू करणे किंवा रेल्वे स्थानकावरील तिकीट घर शौचालय व शेड तातडीने कार्यान्वित करणे, लोकग्राम ब्रिज सद्यस्थिती, दिवा स्टेशन मास्तर हद्द विभाजन, दिवा रेल्वे स्टेशन परिसरात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारणे, दिवा रेल्वे स्थानकात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करणे तसेच दिवा जंक्शन येथे हमाल यांची व्यवस्था करणे व आगासन व दातिवली रेल्वे फाटक रस्ता डांबरीकरणाबाबत चर्चा करण्यात आली आहे.

रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी देखील सकारात्म प्रतिसाद या मागण्यांना दिला असून लवकरच सर्व समस्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांना दिले आहे. यावेळी मनसे रेल्वे सेनेचे अध्यक्ष जितू पाटील, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील , दिवा मनसे अध्यक्ष तुषार पाटील आणि मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

- Advertisement -

प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावा – आमदार राजू पाटील

दिवा पूर्वेकडून पश्चिमेकडे ठाणे महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा करण्यासाठी पुश थ्रू करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र यावर अद्याप रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. या बाबत रेल्वे विभागाने ठाणे मनपाला तातडीने परवानगी द्यावी. अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.


हेही वाचा – मुंबै बँकेवर दरेकरांची वर्णी लागण्याची शक्यता, मविआला धक्का बसणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -