शिवसेनेच्या चिन्हाचे काय होईल? कायदेतज्ज्ञ म्हणतात…

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली आहे. पक्षचिन्ह कोणाकडे राहील यावरून कायदेतज्ज्ञानी प्रतिक्रिया दिली.

shivsena and shinde group

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली आहे. यानंतर पक्षचिन्ह कोणाकडे राहील यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी देशाच्या इतिहासातील काही उदाहरणे देखील दिली.

पासवान कुटुबीयांचा वाद –

खासदार रामविलास पासवान यांचा मृत्यू झाल्यानंतर काका-पुतण्यातील वादात अखेर लोक जनशक्ती पक्षाचे तुकडे झाले. कायदेशीर वादात त्यांच्या पक्षाचे ‘बंगला’ हे चिन्ह गोठवण्याचे आदेश देण्यात आले होते.

एआयएडीएमकेत दोनवेळी वाद –

तामिळनाडूतील AIADMK या पक्षाच्या इतिहासात चिंन्हासाठी आजपर्यंत दोनवेळा अशा प्रकारची न्यायालयीन लढाई झाली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती बघता भविष्यात ती पण एक न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे. तथापि, निवडणूक चिन्हाबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. त्यामुळे हा वाद त्यांच्यापर्यंत गेला तर, ते नोटीस बजावतील व दोन्ही पक्षांना बाजू मांडायची संधी देतील. त्यानंतर आयोग अंतिम आदेश येईल. दरम्यानच्या कालावधीत हे चिन्ह गोठवले जावे, अशी मागणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणाले –

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या एका चर्चा सुरु आहे शिवसेनाच्या चिन्हा बद्दल, माझ्या शिवसैनिकांना सांगितले कायद्याच्या दृष्टीने बघितले तर, घटनेमध्ये नमूद केले आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यामुळे ती चिंता सोडा. मात्र, चिन्ह म्हटल्यानंतर मतदान पत्रिकेवरील चिन्ह ते महत्वाचे आहे ते आपल् धनुष्यबाण आहे ते आपले कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

पण लोकं नुसत धनुष्यबाणावरती  विचार नाही करत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची देखील चिन्ह बघतात, की अरे याची चिन्हा काय बरोबर नाहीत, याची लक्षणे काय बरोबर नाही… हा शिवसेनेचा उमेदवार आहे, तरी लोके विचार करुनचे आपल मतदान करत असतात. त्यानंतर मागच्या काळामध्ये जे काय काय झाले होते सांगितले होते. याचा अर्थ असा नाही होत की, नवीन चिन्हाचा विचार करा… अजिबात नाही.. हे मुद्दाम तुम्हा सगळ्यांना एकत्र बोलवून ठामपणे सांगतो की, शिवसेनेपासून धणुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. हे घटनात्मक, कायदेशीर अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी सांगत आहे, हे मी उगीच माझ्या मनातले बरे वाटावे म्हणून सांगत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.