शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे

शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. (Legendary Investor In Share Market Rakesh Jhunjhunwala Passes Away at 62)

राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांनी ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. मात्र पुन्हा आज सकाळी ६ वाजता प्रकृती खालवल्याने ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राकेश झुनझुनवाला यांची शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ म्हणून ओळख होती. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावायेच आणि त्यामुळे कसा फायदा होते याचे भाकित ते करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा. त्यामुळे अनेकजण त्यांचा सल्ला घ्यायचे. मात्र आता त्यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे.

शेअर बाजारात नवख्या गुंतवणूकदारांना त्यांचा मोठा आधार वाटत असे. काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या ‘अकासा एअर’ या विमान कंपनीचे उद्घाटन केले होते. राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते.

80च्या दशकात राकेश झुनझुनवाला यांनी वडिलांच्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात केली होती. अवघ्या 5000 रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. या 5000 रुपयांच्या गुंतवणुकीच्या आधारे त्यांनी आपले अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते.

राकेश झुनझुनवाला यांच्याबाबत थोडक्यात माहिती

  • राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज.
  • भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 32 व्या स्थानी.
  • सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक.
  • अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष.
  • कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड, प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, यांसारख्या कंपन्याच्या संचालक मंडळावर होते.
  • राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के भागीदारी.
  • पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022 मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या आसपास होते.
  • ‘स्टार हेल्थ’मध्ये त्यांची 14.39 टक्के भागिदारी होती.

हेही वाचा – विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू?, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघात