घरमहाराष्ट्रमहापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांविरोधात कायदा करा; अजित पवारांची मागणी

महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांविरोधात कायदा करा; अजित पवारांची मागणी

Subscribe

आम्ही सुरुवातीपासून सांगतोय महापुरुषांबद्दल सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. त्यातून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी आणि आताच्या कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न या समस्या असतील या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक त्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा अशी मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

बागेश्वर बाबा कोण आहे. त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदायाचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्यसरकारने कारवाई करावी अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.

- Advertisement -

बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत बोलताना आपण लोकशाहीत काम करतो. आपला भारत खंडप्राय देशात लोकशाहीला फार मोठे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान, घटना कायदा दिला आहे. त्या घटना, कायद्यात, संविधानाच्या चौकटीमध्ये बसणार्‍या ज्या बाबी असतील त्या मिडियाने दाखवल्या पाहिजेत. त्या मिडियाने वृत्तपत्रात छापल्या पाहिजेत, लेख पण लिहिले पाहिजेत आणि ज्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, ज्यातून धर्मा-धर्मात तेढ निर्माण होणार आहे, जातीयद्वेष निर्माण होणार आहे, समासमाजात दुही निर्माण होणार आहे, अंतर पडणार आहे अशा गोष्टी आपल्या भारताला परवडणाऱ्या नाहीत आणि अठरापगड जाती असणाऱ्या तुमच्या – माझ्या भारतामध्ये या सगळ्यांचा आदर केला पाहिजे आणि आपल्या सगळ्या महापुरुषांनी याबद्दलचं स्पष्ट मत त्यांच्या – त्यांच्या काळात व्यक्त केले आहे, आज आपण इतिहासात वाचतो आणि त्याच विचारांचे अनुकरण करुन पुढे जाण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत असतो असेही अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, २३ वर्षांनी मिळाला पीडितेला न्याय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -