घर Assembly Battle 2022 काँग्रेसच्या विधान परिषदेत गटनेते पदावर अमरनाथ राजुरकर, तर मुख्य प्रतोद पदावर अभिजित...

काँग्रेसच्या विधान परिषदेत गटनेते पदावर अमरनाथ राजुरकर, तर मुख्य प्रतोद पदावर अभिजित वंजारींची निवड

Subscribe

विधान परिषदेत कॉंग्रेस पक्षाकडून आज गटनेते पद आणि मुख्य प्रतोद पदाची घोषणा करण्यात आली. राज्याचे महसूल मंत्री आणि माजी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या नावांची घोषणा केली. विधान परिषदेत गटनेते पदावर अमरनाथ राजुरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर अभिजित वंजारी यांच्याकडे मुख़्य प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही घोषणा थोरात यांनी केली.

याआधीचे कॉंग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. तर मुख्य प्रतोद पदावर असणार्‍या भाई जगताप यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ याआधी झालेल्या हिवाळी अधिवेशनात संपुष्टात आला होता. त्यामुळेच या रिक्त पदांवर काँग्रेसकडून नेमणूक करण्यात आली.

- Advertisement -

विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते पद मिळवणारे अमरनाथ राजुरकर यांची विधान परिषदेची ही दुसरी टर्म आहे. याआधी २०१० ते २०१६ या कालावधीत ते विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. तर २०१६ मध्ये राजुरकर पुन्हा एकदा निवडून आले. तर मुख्य प्रतोद पदावर नेमणूक झालेले अभिजित वंजारी हे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेचे आमदार म्हणून २०२० मध्ये निवडून आले आहेत.


Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 156 नवे रुग्ण, 269 कोरोनामुक्त

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -