घरमहाराष्ट्रLegislative Council Election : विधान परिषदेच्या 21 जागा होणार रिक्त; जूनमध्ये 15...

Legislative Council Election : विधान परिषदेच्या 21 जागा होणार रिक्त; जूनमध्ये 15 जागांसाठी निवडणूक?

Subscribe

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधरचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे मतदारसंघाचे कपिल पाटील आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे यांची मुदत येत्या 7 जुलै रोजी संपत आहे. या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, या चार मतदारसंघासाठी जून महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 21 जागा रिक्त असताना पुढील सहा महिन्यात आणखी 21 सदस्यांची मुदत संपणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या 27 पर्यंत पोहचणार आहे. मात्र, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक अशा प्रत्येकी दोन तसेच विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे 11 अशा एकूण १५ जागांसाठी निवडणूक होऊ शकते. ही निवडणूक येत्या जून महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षात नवे डावपेच खेळले जातील. (Legislative Council Election 21 seats of Legislative Council will be vacant Election for 15 seats in June)

येत्या मे आणि जून महिन्यात अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी संस्था), नरेंद्र दराडे (नाशिक स्थानिक प्राधिकारी संस्था), रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी संस्था), विप्लव बाजोरिया (परभणी- हिंगोली- स्थानिक प्राधिकारी संस्था), सुरेश धस (धाराशिव- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी संस्था) आणि प्रवीण पोटे- पाटील (अमरावती स्थानिक प्राधिकारी संस्था) यांची विधान परिषदेची मुदत संपत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या दोन-अडीच वर्षांपासून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या सहा जागांची निवडणूक होण्याची शक्यता नाही. याआधीच अहमदनगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली -सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा- गोंदिया या नऊ स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या रिक्त जागांमध्ये आता आणखी सहा जागांची भर पडणार आहे.

- Advertisement -

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधरचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे मतदारसंघाचे कपिल पाटील आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे यांची मुदत येत्या 7 जुलै रोजी संपत आहे. या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, या चार मतदारसंघासाठी जून महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे.

हेही वाचा : Uniform Civil Code Bill: उत्तराखंडने रचला इतिहास; विधानसभेत समान नागरी कायदा मंजूर

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे निवडून गेलेल्या 11 सदस्यांची मुदत 27 जुलै 2024 रोजी संपत आहे. त्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मनीषा कायंदे, उद्धव ठाकरे गटाच्या अनिल परब, भाजपच्या विजय गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, काँग्रेसच्या डॉ. वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Maharashtra Doctor Strike: अजित पवारांच्या आश्वासनानंतर निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे!

विधान परिषदेच्या निवडणुका गुप्त मतदानाने होतात. दोन वर्षपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची मते फुटून काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा नामुष्कीजनक पराभव झाला होता. या निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडखोरी होऊन त्याची परिणती महविकास आघाडी सत्तेतून पायउतार होण्यात झाली. गेल्या काही दिवसात राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून भारत निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह बहाल केले. त्यामुळे विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या एकजुटीची कसोटी पाहणारी ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -