घरअर्थसंकल्प २०२२कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या पगाराच्या मुद्द्यावर विधान परिषदेत गोंधळ

कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या पगाराच्या मुद्द्यावर विधान परिषदेत गोंधळ

Subscribe

राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या १०० टक्के पगाराच्या मुद्द्यावर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा स्थगित झाले. विधान परिषदेचे सदस्य कपिल पाटील यांनी सभागृहात हा प्रश्न मांडला होता. या विषयावर सदनात वारंवार आश्वासन देऊनही प्रश्न मार्गी लागला नसल्याची बाब त्यांनी सभागृहात सांगितली. या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने ही मागणी लावून धरत सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सुरूवातीला १० मिनिटे आणि नंतर ५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पण सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा नियमित सुरू झाले.

कपिल पाटील यांनी सभागृहात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाची आठवण करून दिली. त्यांच्या काळातच हा विषय मार्गी लावण्यासाठीचे आश्वासन देण्यात आले होते. पण अनेक वर्षानंतरही प्रश्न मार्गी लागला नसल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. गेली अनेक वर्षे विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन होते. पण हा प्रश्न अद्यापही सोडवण्यात आलेला नाही. त्यामुळे हा विषय सोडवण्याची मागणी कपिल पाटील यांनी केली. कोरोनाच्या काळात गेलेली २ वर्षे आपण समजू शकतो, पण गेल्या १२ वर्षात शासनाने कोणतीही रावल उचलली नसल्याची बाब त्यांनी सभागृहात सांगितली.

- Advertisement -

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही याआधीच्या अधिवे‌नात बैठक लावूनही त्याचा उपयोग झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे यावेळी स्वत: शिक्षकांच्या वेतनासाठी मुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशनाचे २ दिवस उरले आहेत, या दोन दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही सभापतींनी स्पष्ट केले.


हेही वाचा : पाटणकरांवर खोट्या माहितीच्या आधारे कारवाई ; खासदार संजय राऊतांचा घणाघात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -