घरमहाराष्ट्रविधान परिषद बिनविरोध...!

विधान परिषद बिनविरोध…!

Subscribe

विधान परिषदेच्या ११ आमदारांचा कालावधी संपुष्टात येऊन या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये शिवसेनेचा एक तर भाजपाचे दोन सभासद निवृत्त होणार असून वाढलेल्या संख्याबळामुळे शिवसेनेचे दोन तर भाजपचे पाच सभासद निवडून येणार आहेत. मात्र आता शेकापच्या जयंत पाटील यांनी ११ व्या जागी अर्ज दाखल केला अाहे.

विधान परिषदेच्या ११ आमदारांचा कालावधी संपुष्टात येऊन या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये शिवसेनेचा एक तर भाजपाचे दोन सभासद निवृत्त होणार असून वाढलेल्या संख्याबळामुळे शिवसेनेचे दोन तर भाजपचे पाच सभासद निवडून येणार आहेत. एक आमदार निवडीसाठी एकूण २५ आमदारांचा मतांचा कोटा निश्चित केला असून एकूण संख्याबळ पाहता शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. तर भाजपाकडे अपक्ष व छोटे पक्ष पाहता १३७ एवढे संख्याबळ असून नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांची देखील मतं आहेत.

११ व्या जागेवर बिनविरोध 

काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्या संख्याबळानुसार तीन आमदार निवडून येऊ शकतात. तर शिवासनेनेचे दोन आमदार ५० मतांवर निवडून येऊन १३ अधिकची मतं उरतात. त्याशिवाय भाजपाकडे १२५ मतांवर पाच आमदार निवडून येऊन १२ अधिकची मतं उरतात. म्हणजेच शिवसेनेची जास्तीची १३ व भाजपाची १२ मतं यावर युती होऊन अजून एक आमदार निवडून येऊ शकला असता. परंतू शेकापच्या जयंत पाटील यांनी ११ व्या जागी अर्ज दाखल केला असून १२ वा अर्ज न आल्याने घोडेबाजार कोणासाठी झाला हे आता वेगळं सांगाव लागणार नाही.

- Advertisement -

सेनेचा ‘एकला चालो रे’चा नारा 

भाजपा मोठ्या भावाची भूमिका घेत १३ जास्तीची मतं असणाऱ्या शिवसेनेनेला पाठबळ देत, शिवसेनेचाच तिसरा उमेदवार निवडून आणून, सेना-भाजप युतीचे भविष्याचे संकेत भाजप देऊ शकली असती. परंतू शिवसेनेने पाठींबा न मागून ‘एकला चालो रे’ ची भूमिका स्पष्ट केली आहे, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले आहे. पण शेकापचे जयंत पाटील भाजपच्या भूमिकेमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे, अपक्ष, बहुजन विकास आघाडी आणि शेकापचे संख्याबळ कमी असताना ही विधान परिषदेत पुन्हा एकदा बिनविरोध निवडले जाणार आहेत.

ठळक मुद्दे 

  • विधान परिषदेच्या ११ व्या जागेवर बिनविरोध घोडेबाजार
  • बिनविरोध निवडणुकीने शिवसेना – भाजपा युती होणार नसल्याचे नक्की
  • बिनविरोध निवडणुकीने शेकापचे जयंत पाटील परिषदेवर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -