घरताज्या घडामोडीआजीमुळे बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका 

आजीमुळे बिबट्याच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका 

Subscribe
पळसे शिवारात 5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. पण आजीच्या सतर्कतेमुळे बिबट्या पळाला आणि चिमुकलीचा जीव वाचला. हल्ल्यात तिच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या असून तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेवगेदारणा व पळसे गावाच्या शिवावर असलेल्या रस्त्याच्या कडेला अंकुश कासार यांच्या घराच्या ओट्यावर बुधवार (दि.१०) रात्री ८.३० च्या सुमारास त्यांची मुलगी  समृद्धी (५) जेवण झाल्यानंतर ओट्यावर आजी भद्राबाई कासार यांच्या बरोबर खेळत होती. यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने समृद्धीवर हल्ला केला. समृद्धी ओरडल्याने जवळच बसलेल्या आजीने बिबट्याच्या जबड्यातून तिला खेचले. तितक्यात बिबट्या पळून गेला . जखमी झालेल्या समृद्धीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -