घरमहाराष्ट्रअहमदनगर- कल्याण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अहमदनगर- कल्याण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Subscribe

गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याचे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्या लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला करुन त्यांची शिकार करत असतो. मात्र आता याच शिकारीच्या मागे फिरताना बिबट्यांचे अपघात होत आहे.

अहमदनगर- कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जबर जखमी झालेल्या बिबट मादीचा मृत्यू झाला आहे. उपचारा दरम्यान या बिबट्याचा मृत्या झाला आहे. रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी जबर जखमी झाली होती. या जखमी बिबट्यावर जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारण केद्रांत उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान अखेर या बिबट मादीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यावेळी या बिबट्याचा अपघाता झाला त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. तसेच अनेकजण जखमी अवस्थेतील बिबट्याला डिवचत असल्याचे समोर आले आहे.

उपचारा दरम्यान बिबट्याचा मृत्यू

अहमदनगर-कल्याण महामार्गावर शनिवारी ढमाळे मळा परिसरातील राजलॉन्स मंगल कार्यालयासमोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. या बिबट्याच्या कमरेला जबर जखम झाली. त्यामुळे त्याला उठून चालता येत नव्हते. अपघाताची माहिती मिळताच काहीच वेळात माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे डॉ अजय देशमुख यांची टीम घटनास्थळावर दाखल झाले. या बिबट्याला दोन भुलीची इंजेक्शन देऊन बेशुध्द करुन पुढील उपचारासाठी बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले. त्याठिकाणी बिबट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याचे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्या लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला करुन त्यांची शिकार करत असतो. मात्र आता याच शिकारीच्या मागे फिरताना बिबट्यांचे अपघात होत आहे. त्यामध्ये बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्यांची दिवसेंदिवस संख्या वाढू लागल्याने त्यांचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले. यामुळे अनेक ठिकाणी बिबट आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष होत असला तरी बिबट्याचे होत असलेले अपघात आणि मृत्युमुळे जुन्नर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -