घरताज्या घडामोडीविहिरीत पडला बिबटया

विहिरीत पडला बिबटया

Subscribe
 चेहेडी- चाडेगाव शिवावरील नारायण अरिंगळे यांच्या विहिरीत बिबटया पडल्याचा आज (दि.२४) सकाळी आढळून आला.  शेतकऱ्याने वनविभागाशी संपर्क साधत बिबटया विहिरीत पडल्याचे सांगितले. भक्ष्याच्या शोधात असताना बिबटया विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
   विहिरीच्या पाण्यात पडल्यामुळे बिबट्या चांगलाच कुडकुडला आहे. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बिबट्या पडल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच सर्वांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -