घरमहाराष्ट्रसह्याद्रीच्या कुशीतील धरणांनी गाठला तळ

सह्याद्रीच्या कुशीतील धरणांनी गाठला तळ

Subscribe

बळीराजाला आता प्रतिक्षा पावसाची 

राजगुरुनगर:सह्याद्रीच्या पर्वत रांगातून येणाऱ्या पाण्यावर खेड तालुक्यात तीन मोठे जलाशय उभारण्यात आले आहेत. त्यातील पाण्याचा उपयोग शेती व पिण्यासाठी होतो. वर्षभर बळीराजाची साथ देणाऱ्या या जलाशयांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भिमा नदीवरील चासकमान, आसखेड,कलमोडी या तीनही धरणांमधील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. त्यामुळे बळीराजासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

पाणी साठ्यात कमालीची घट

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील भिमा खोऱ्यांमध्ये पिंपळगाव-जोगे, माणिकडोह, डिंभे, भामा-आसखेड, चासकमान, मुळशी, भाटघर, वीर, निरा-देवधर, गुंजवणी, उजनी आदींसह २५ धरणांचा समावेश आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे १०० टक्के भरली होती. सध्या काही धरणांमधून शेतीसाठी आवर्तन सोडले जात आहे. मात्र कडाक्यातून उन्हामुळे या पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होत असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट होऊ लागली आहे.भीमा-आसखेड व चासकमान धरणावर अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असतात. यंदा या धरणांनी तळ गाठल्यामुळे या भागात तीव्र पाणी टंचाईचे निर्माण झाली आहे. त्यामुळे आता बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे

प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
चासकमान – ०.९०
भामा आसखेड – २.६२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -