घरताज्या घडामोडीडिस्चार्ज रुग्णांची काळजी घेण्याचे परिचारिकांना धडे

डिस्चार्ज रुग्णांची काळजी घेण्याचे परिचारिकांना धडे

Subscribe

जे जे समुह रुग्णालयाकडून प्रशिक्षण

प्रसुती नंतर महिला घरी गेल्यावर बाळाच्या आरोग्याची घेण्यात येणारी काळजी आता रुग्णालयातून परिचारिका देणार आहेत. जे जे रुग्णालयातील परिचारिकांना तसे रुग्णस्नेही प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. वायओएस एड तसेच नुरा हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांच्या काळजीचे प्रशिक्षण येथील परिचारिकांना देण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

जे जे रुग्णालयातील परिचारिकांना रुग्णांच्या काळजी घेण्याचे धडे प्रशिक्षणातून नुकतेच देण्यात आले. याचा वापर त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या रुग्णांसंबंधीत समस्या सोडविण्यासाठी करणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये फ्लिपचार्ट, जेवणाची थाळी कशी असावी, स्तनाचे मॉडेल माहितीपत्रक, बाहूली, व्हाट/सअ‍ॅप व्हिजीटींग कार्ड, विविध व्हिडीओज माध्यमातून देण्यात आली. फ्लिपचार्टमध्ये प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतरची आई आणि बाळांची काळजी घेण्यासंबंधीत फोटोंचा समावेश आहे. त्याचवेळी लहान मुलांचे किंवा गर्भवती महिलांना आजार झाल्यास त्याची लक्षणे कशी ओळखावी याबाबतची संपूर्ण माहिती चार्टस तसेच व्हिडीओजमार्फत देणार आहेत. यामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात येण्याची गरज भासणार नाही. शिवाय रुग्ण महिलांना त्यांच्या खाजगी आजारासाठी व्हॉटसअ‍ॅप नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर मिसकॉल केल्यास तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

- Advertisement -

रुग्णांसाठी उपयुक्त प्रशिक्षण – तज्ज्ञ डॉक्टरांचे मत

यावर नुरा हेल्थ आणि वायओएस एडचे डॉ. अभिमन्यु कोतवाल यांनी परिचारिकांना प्रशिक्षण देऊन रुग्णांच्या शंकाचे निराकरण करण्याचे मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तर जेजे रुग्णालयाच्या मेट्रेन योजना बेलदार यांनी या उपक्रमाचे स्वागत करत परिचारिकांना तसेच रुग्णांना हे उपयुक्त असल्याचे म्हणाल्या. यातील माहितीपुस्तीका, चार्टस यांचा समावेश असल्याने त्याचा दिर्घकाळासाठी उपयोग होईल. शिवाय रुग्ण ही आजारांसबंधी लक्षणे ओळखून रुग्णालयास लवकरात लवकर संपर्क करु शकतील. या कार्यमक्रमाचे उद्घाटन जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी केले असून हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे डॉ. सापळे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -