घरमहाराष्ट्रअजित पवार लवकर मुख्यमंत्री होऊ दे; लालबागच्या चरणी आलेल्या चिठ्ठीची जोरदार चर्चा

अजित पवार लवकर मुख्यमंत्री होऊ दे; लालबागच्या चरणी आलेल्या चिठ्ठीची जोरदार चर्चा

Subscribe

अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं साकडं त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी घातलं आहे. आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी एक चिठ्ठी ठेवली. त्यात अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, असं लिहिण्यात आलं आहे. यावेळी अजित पवारांसोबत दर्शनासाठी खासदार सुनील तटकरे, मुलगा पार्थ पवारही उपस्थित होते. (Let Ajit Pawar become Chief Minister soon Ranjeet Narote There was a strong discussion about the letter that came at the feet of Lalbaug )

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा हा शपथविधी झाल्यानंतर ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाला एक नवस केला आहे.

- Advertisement -

लालबागच्या राजाला नवस 

राज्यामध्ये सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. अशात अनेक उद्योगपती, अभिनेते, अभिनेत्री, राजकीय मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जातात. लालबागच्या राजा समोर खूप भाविक आपल्या इच्छा आणि नवस बोलून दाखवतात. अशात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रणजीत नरोटे यांनी देखील लालबागच्या राजाला एक नवस केला आहे. लवकरात लवकर अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ द्या, असा मजकूर असलेली चिठ्ठी रणजीत नरोटे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली आहे. त्यांच्या या कृत्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह पार्थ पवार आणि सुनिल तटकरेही उपस्थित होते.

- Advertisement -

(हेही वाचा: NCP Mumbai President: अजित पवार गटाकडून मुंबईचा कारभार समीर भुजबळांकडे )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -