घर महाराष्ट्र पुणे बळीराजावरचे संकट दूर होऊ दे, समाधानकारक पाऊस पडू दे; मुख्यमंत्र्यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

बळीराजावरचे संकट दूर होऊ दे, समाधानकारक पाऊस पडू दे; मुख्यमंत्र्यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

Subscribe

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (11 सप्टेंबर) श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ज्योतिर्लिंगाचे (Sri Kshetra Bhimashankar Temple Jyotirlinga) दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे, अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Let the calamity on Baliraja be removed let the satisfying rain fall Chief Ministers prayer to Bhima Shankar)

हेही वाचा – जंत्र-तंत्र-मंत्र जादूटोणा यातच अडकलेत…; भीमाशंकर यात्रेवरून राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भावीक श्रद्धेने आणि भक्तीभावाने याठिकाणी दर्शनाला येत असतात. मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलो आहे. याठिकाणी लाखो भक्त येत असल्याने शासनाने 148 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील 68 कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – आरक्षण हा सामाजिक मुद्दा, राजकारण करू नका; मुख्यमंत्री शिंदेचे विरोधकांना आवाहन

- Advertisement -

पुजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते. याशिवाय जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसिलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -