घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

मुंबई : आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधींना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलाने उभारूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवे वर्ष आरोग्यदायी ठरावे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी मनोकामनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्याचे पर्व घेऊन येते. या निमित्ताने आपण ऋतुचक्रातील बदलाचा आनंददायी उत्सव साजरा करतो. अशा या नववर्षाच्या उत्साही क्षणांतून आपल्याला नवनिर्मितीची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्न करूया.

- Advertisement -

नववर्षाचे स्वागत करताना आपण पर्यावरणाचे भान देखील बाळगूया. आपल्या परिसरात स्वच्छता राखूया. पाणी, हवा यांचं प्रदूषण रोखण्याची जागरुकता निर्माण व्हावी, असे प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मनामनात नवसंकल्पनांची पालवी फुलावी, हीच सदिच्छा. महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी उंच उभारूया, तिची पताका जगाच्या क्षितीजावर अभिमानाने आणि डौलाने फडकत रहावी, असा निर्धार करूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनीही दिल्या शुभेच्छा
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त राज्यापाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष राज्यातील लोकांसोबत साजरे करताना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादीयुगादिसंसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून आनंदाने साजरा केला जातो. हा सण सर्वांच्या जीवनात आनंदउत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करोया प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोअसे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -