घरमहाराष्ट्रLetter Bomb: तो ई-मेल माझाच; परमबीर सिंग यांचं स्पष्टीकरण

Letter Bomb: तो ई-मेल माझाच; परमबीर सिंग यांचं स्पष्टीकरण

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रातून केला. या लेटर बॉम्ब (Letter Bomb) नंतर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. विरोधक गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, ज्या पत्रावरून खळबळ उडाली त्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शंका उपस्थित करण्यात आली. मात्र, आता परमबीर सिंग यांनी तो ई-मेल माझाच असल्याचे स्पष्ट केलं आहे.

परमबीर सिंग यांना एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना तो ई मेल माझाच आहे, असं सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेला मेल हा माझ्याच ई-मेल आयडी वरून पाठवला आहे, असं स्पष्टीकरण परमबीर सिंग यांनी दिलं आहे. परमबीर सिंग यांच्या स्पष्टीकरणामुळे हे प्रकरण चांगलंच तापणार आहे. तसंच परमबीर सिंग यांच्या स्पष्टीकरणावर मुख्यमंत्री कार्यलय काय उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्राबद्दल चौकशी

गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं होतं. मात्र आता परमबीर सिंग यांनी तो ई मेल माझाच असल्याचं स्पष्ट केल्याने मुख्यमंत्री कार्यालय काय उत्तर देतं हे पाहून औत्सुक्याचे असणार आहे.


हेही वाचा- Parambir Singh Letter: गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधाकांची जोरदार मागणी

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -