घरमहाराष्ट्रनाशिकसंमेलन जागा निश्चितीसाठी साहित्य महामंडळाला दिले पत्र

संमेलन जागा निश्चितीसाठी साहित्य महामंडळाला दिले पत्र

Subscribe

साहित्य संमेलन आयोजनाबाबत अद्यापही तारीख पे तारीख

नाशिक : शहरात प्रस्तावित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाबाबत अद्यापही तारीख पे तारीख सुरु आहे. खुले जागांवर सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई असल्याने आणि डिसेंबर २०२१ पूर्वीच साहित्य संमेलनासाठी स्वागत समितीकडून जोरदार हालचाली सुरु झालीय. स्वागत समितीतर्फे साहित्य संमेलन जागा आणि तारीख निश्चितीसाठी साहित्य महामंडळाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महामंडळाकडून जागा आणि तारीख निश्चित होताच स्वागत समितीतर्फे जाहीर केल्या जाणार आहेत.

संमेलन आयोजनाबाबत साहित्य महामंडळ आणि स्वागत समितीमध्ये पत्रव्यवहार सुरु आहे. साहित्य महामंडळाने शेवटच्या आठवड्यात साहित्य संमेलन घ्यावे, असे सुचवले असले तरी स्वागत समितीने नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात परवानगी द्यावी, असा पत्रव्यवहार केला आहे. राज्य शासनाने २ ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना नियम व अटींवर परवानगी दिली आहे. मात्र, शासनाकडून खुल्या जागेवरील कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. दरम्यान, एचपीटी कॉलेजऐवजी भुजबळ नॉलेज सिटी येथे संमेलन आयोजित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ही जागा निश्चित मानली जाते आहे.

- Advertisement -

कार्यालयाचे होणार स्थलांतर

एचपीटी कॉलेजमध्ये ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे कार्यालय आहे.नवीन जागा निश्चित करताना या कार्यालयाचेसुद्धा स्थलांतर केले जाणार आहे. त्यासाठी स्वागत समितीतर्फे चाचणी सुरु आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -