घरक्राइमअत्याचार प्रकरणी नराधमाला जन्मठेप; विशेष पोस्को न्यायालयाचा निकाल

अत्याचार प्रकरणी नराधमाला जन्मठेप; विशेष पोस्को न्यायालयाचा निकाल

Subscribe

मेहुण्याच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार करत तिला सात महिन्यांची गरोदर करणाऱ्या ४० वर्षीय नराधम आत्याच्या नवऱ्याला ठाणे अतिरिक्त सत्र (विशेष पोस्को) न्यायालयाच्या न्यायमूर्ती व्ही.व्ही वीरकर यांनी बुधवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

मेहुण्याच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार करत तिला सात महिन्यांची गरोदर करणाऱ्या ४० वर्षीय नराधम आत्याच्या नवऱ्याला ठाणे अतिरिक्त सत्र (विशेष पोस्को) न्यायालयाच्या न्यायमूर्ती व्ही.व्ही वीरकर यांनी बुधवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा प्रकार जुलै २०१६ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. तर, पीडित मुलीने एका बाळाला जन्म ही दिला आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. (Life imprisonment for murder in torture case Judgment of Special POCSO Court)

पीडित मुलगी ही १६ वर्षीय असून तिचे वडीलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. याचदरम्यान तिची आई तिला सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे पीडित मुलगीही दिवसभर तिच्या वडिलांच्या आईकडे राहत होती. तर रात्री झोपण्यासाठी (वडिलांच्या बहिणीकडे) आपल्या आत्याच्या घरी जात होती.

- Advertisement -

जुलै २०१६ मध्ये पीडित ही तिच्या आत्याच्या घरी गेली असताना, तिची आत्या झोपी गेल्यावर आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आणि याबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी हा तिला धमकी देत, तिच्यावर डिसेंबर २०१७ पर्यंत अत्याचार करत होता. तसेच तिला सात महिन्यांची गरोदर केली.

याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (२) (एन), ५०६, सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,१२ प्रमाणे ०८ फेब्रुवारी २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल केले.

- Advertisement -

हा खटला ठाणे (विशेष पोस्को) न्यायालयाच्या न्यायमूर्ती वीरकर यांच्या समोर आल्यावर सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सुनावणी दरम्यान काही पुरावे सादर केले. तसेच ११ साक्षिदार तपासले. ते पुरावे आणि साक्षिदारांची साक्ष ग्राहय मानून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत, पोस्को कायद्याच्या कलम ६ नुसार जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १०० दिवस साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.


हेही वाचा – तुम्ही कोण, त्याचं आधी उत्तर द्या- अंबादास दानवेंचा शिंदे गटाला सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -