Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र जीवन खूप अमूल्य आहे..., रोहित पवार यांनी गोविंदांबद्दल व्यक्त केली चिंता

जीवन खूप अमूल्य आहे…, रोहित पवार यांनी गोविंदांबद्दल व्यक्त केली चिंता

Subscribe

मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा उत्साह दिसत आहे. अनेक ठिकाणी मनाच्या दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्यात पावसानेही हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या एका घटनेचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गोविंदांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षी गोकुळाष्टमीला विलेपार्लेच्या बामणवाडा परिसरातील दहिहंडी फोडताना प्रथमेश हा तरुण खाली कोसळला होता. गंभीर जखमी झालेल्या संदेशला तातडीने आधी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती अधिक खालावल्याने त्याला नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले. पण चारच दिवसांत त्याचा मृत्यू झाला. तीन भावंडांमध्ये संदेश हा सर्वात लहान होता. विलेपार्ले येथील शिवशंभो पथकातील हा गोविंदा होता.

हेही वाचा – ठाण्यात पावसाचा आणि गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला

- Advertisement -

हाच संदर्भ देत आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवात पथकातील वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश सावंत हा गोविंदा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाचव्या मणक्याला गंभीर दुखापत होऊन प्रथमेशच्या कमरेखालील भागातील संवेदना बाधित झाल्या होत्या. तो हॉस्पिटलमध्ये असताना त्याची भेट घेतली होती, त्याच्याकडे प्रचंड उत्साह आणि जिद्द होती. पण शेवटी मृत्यूसोबतच्या झुंजीत तो अपयशी ठरला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; बैठकीत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

ज्यांच्यासोबत दुर्घटना होते, त्यांचेच वाईट होते. त्यांच्याच कुटुंबाला संकटांचा सामना करावा लागतो. बाकी कोणालाही काहीही घेणे-देणे नसते ही वस्तुस्थिती आहे. जीवन खूप अमूल्य आहे. त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी योग्य त्या सुरक्षेच्या उपाययोजनांसह खेळात सहभागी व्हावे, योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

- Advertisment -