राज्यात ४८ तासांत अवकाळी पावसाची शक्यता

चक्रवाती परिभ्रमण मराठवाडा आणि लगतच्या भागात पुढील ४८ तासांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

light rain is expected in the southern part of vidarbha in 24 to 48 hours
राज्यात ४८ तासांत अवकाळी पावसाची शक्यता

विदर्भामध्ये मागील चोवीस तासात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे ढगाळ परिस्थिती आणि त्यानंतरच्या पावसामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. तर दुसरीकडे कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वातावरण कोरडे राहिले आहे. दपरम्यान, वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्यामुळे विदर्भातील दक्षिणेकडील भागातही पुढील १२ ते १८ तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भाग आणि उर्वरित उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडेच असणार आहे. तसेच मुंबईत देखील दिवस आणि रात्रीसह हवामान कोरडे राहणार आहे. तर दिवसाचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता असून किमान तापमान २० अंशांपेक्षा जास्त राहणार आहे.

४८ तासांत हलक्या सरींची शक्यता

चक्रवाती परिभ्रमण मराठवाडा आणि लगतच्या भागात पुढील ४८ तासांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच पुणे शहरात हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमान २९ अंशांच्या आसपास तर किमान १६ अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – हिंगणघाट पीडितीची झुंज अपयशी; प्राध्यापिकेचा मृत्यू